कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह?
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहोगाव चॅनेज नंबर १५६ या पुलावर जीवघेणा खड्डा पडल्याने समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण आहे. ? ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. ज्याठिकाणी या रस्त्याला खड्डा पडून काँक्रिट खाली पडले त्यावेळी काही शेतकरी तेथून जात होते मात्र सुदैवाने जीवितहानी टळली.
५५ हजार कोटी रुपये खर्च करून नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला. हा महामार्ग सुरु होऊन जेमतेम एक वर्ष होऊन गेलं. १२० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने चालणारी वाहन अशा खड्यातून गेल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.चॅनेज नंबर १५६ या ठिकाणी हा जीवघेणा खड्डा पडल्याने कामाच्या दर्जावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
१५६ या चॅनेजचे काम एन.सी.सी या कंपनीने केले आहे.अत्यंत निकृष्ट दर्जाच काम झाल्यानेच या महामार्गात खड्डा पडल्याचं बोलल्या जात आहे. या समृद्धी महामार्गाच्या चॅनेज नंबर १५६ चे निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.