अन्यथा आंदोलन करू,गावकऱ्यांचा इशारा
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
विद्यार्थी येणाऱ्या काळाचे भविष्य आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिरपूर येथील जिल्हा परिषद शाळा येथे गेल्या वर्षभरापासून वारंवार विनंती करून सुद्धा, भाषा व विज्ञान शिक्षक पद रिक्त आहे आहे. शिकवायला शिक्षक कळत नसल्याकारणाने येथील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.
तरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान थांबाव, ह्या जागा लवकर भरण्यात यावी यासाठी ओम मोरे यांनी शिक्षण अधिकारी पंचायत समिती यांना निवेदन दिले. जिल्हा परिषद शाळा शिरपूर येथील भाषा व विज्ञान शिक्षक लवकर भरण्यात यावे. अन्यथा तीव्रप्रकाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी स्वराज्य अकॅडमीचे संस्थापक राहुल हजारे, ऋषिकेश शेगोकर उपस्थित होते.