निवृत्ती शंकर उधारे असे मृतकाचे नाव.
स्टेट बँकेसह खाजगी बँकेचे होते कर्ज.
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खानापूर (गवळी) येथील तरुण शेतकऱ्याने कर्ज बाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना दिं.२९ फेब्रू.ला सकाळी ५.०० वाजता घडली असून मृतक शेतकऱ्याचे नाव निवृत्ती शंकर उधारे (वय 38)असे आहे. सततच्या नापिकीमुळे व बाजारभाव घसरल्यामुळे जीवनाला
कंटाळून शेवटी गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांच्या मागे त्यांची दोन मुले व पत्नी आई असा आप्तपरिवार असून त्यांच्या निधनामुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यावर स्टेट बँक मंगरुळ चव्हाला शाखेचे एक लाख पंचवीस हजार आणि खासगी बँकेचे एक लाख पन्नास हजार रुपये कर्ज होते सदर कर्ज भरण्यास असमर्थ असल्याने तरुण शेतकऱ्याने आपली जीवन यात्रा संपवली आहे. सदर प्रकरणी मंगरुळ चव्हाला पोलीस स्टेशनमध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.