माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी.
नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले या नुकसानीचे त्वरित सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना काँग्रेसच्या वतीने देण्यात आले,माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी तालुक्याचा दौरा करून खंडाळा, रोहना, जावरा,गौरखेडा, शिवनी या गावातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली, गहू,हरभरा, संत्रा, कांदा,तीळ,लसन,तुरीच्या सोंगलेल्या गंज्या या पिकांचे नुकसान झाले असे आढळून आले.
यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप,माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर, शहर काँग्रेस अध्यक्ष अमोल धवसे, रमेश ठाकरे, डॉ.संजय जेवडे, भैय्यासाहेब रोहनेकर,,सरपंच अमरीश काकडे, नरेशभ ठाकरे, दिनेश धवस, प्रशांत देशमुख,सर्फराज पठाण,रवींद्र काकडे,उपसरपंच आशिष कडू, सुरेश तादुळकर,पवनल रोहनेकर, विजय चीचे, नितीन कडू, रघुपती गावंडे, मंगेश गावंडे, कैलास लांडे, मनोहर काकडे, रवींद्र थोरात,अजय दहातोंडे, दिवाकर देवरे,सुधीर चौधरी,आशिष गावंडे,प्रवीण गावंडे,मोरेश्वर वंजारी, मनोहर काकडे, आशिष शिरभाते,हि शेतकरी मंडळी उपस्थित होती.