नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर द्वारे बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत पुर्ण झालेल्या अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील टिमटाला लघु सिंचन प्रकल्पाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते यवतमाळ येथील सभेतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे लोकार्पण करीत राष्ट्राला समर्पित करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, देश्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना संघ शाखेत असतांना देशसेवा व राष्ट्रनिर्माणाचे धडे देणारे कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शिलास्मारकाचे शिल्पकार श्रध्देय एकनाथजी रानडे यांची जन्मभूमी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुका अंतर्गत येणारे टिमटाळा हे गाव केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे दत्तक ग्राम सुद्धा आहे. त्याद्वारे खासदार दत्तक ग्राम योजनेअंतर्गत विविध योजना टिमटाळा गावात राबविल्या जात आहे. त्यापैकीच एक म्हणजे बळीराजा जलसंजीवनी योजना.
शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची समस्या निवारणासाठी परिसरातील शेतक-यांना वरदान ठरीत असलेल्या शेकडो हेक्टर जमीन क्षेत्रात स्थापित टिमटाला लघु सिंचन प्रकल्पाचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदीसाहेब यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे लोकार्पण करीत राष्ट्राला समर्पित करण्यात आले. दि. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी यवतमाळ येथील सभेतून आपल्या गुरूवर्यांच्या जन्मगावाला न्याय देत, प्रत्यक्षात जरी टिमटाळा येथे न येता, तरी त्यांच्याच हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे टिमटाळा लघु सिंचन प्रकल्पाचे लोकार्पण होणे ही टिमटाळावासियांसाठी अभिमानाची बाब असून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते श्रीपाल सहारे यांनी दिली आहे.