शेकडो दिंड्याचीं उपस्थिती.
भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ.
नांदगावं खंडे./तालुका प्रतिनिधी.
तालुक्यातील श्री क्षेत्र सावणेर येथे दि 27फेब्रुवारी ते 5मार्च संत वामन महाराज संस्थान सावणेर येते भागवतचार्य गुरु शांती नाथ योगी निरंजन नाथ यांच्या सुमधुर वाणीतून कथा सपन्न झाली मंगळवार सकाळी काल्याचे कीर्तन झाले नंतर सावणेर नगरींतून बाबाचा दिंडी सोहळा पालखी दिंड्या पताका लेझीम सह निघाला यावेळी अमरावती यवतमाळ वाशीम जिल्ह्यावरून दीड्यांची उपस्थिती होती हरीनामच्या गजरात सावणेर नगरी दुमदुमून गेली होती संत महापुरुषांचे देखावे तसेच चौकाचौकात स्वागताच्या कमानी लावण्यात आल्या होत्या. कुठे नास्ता तर कुठे चहा,थंड पाणी,सरबतची व्यवस्था सावणेर वासियांनी केली होती.तसेच संस्थान मधे मुबई येथील डॉ. सुभाष भोयर व डॉ.स्मिताताई भोयर यांनी मोफत रुग्ण तपासणी व मोफत औषध वाटप केले.
यावेळी हजारो रगणांनी लाभ घेतला तर लहान मुलांना खेळण्याकरिता झुला आकशापळणाजम्बीग जपाग सारखे झुल्यावर लहामुल आनंद घेत होते तर महिला गृहउपयोगी वस्तु खरेदी करत होत्या आनंदमय वातावरणात पालखी सोहळा गौरक्षनाच्या प्रांगनात आल्यानंतर दहीहंडी व काला झाला नंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नांदगावं खंडे.
येथील ठाणेदार सोळंके यांच्या मार्गदर्शनात पी एस आय. तुळजेवार तसेच बिट जमदार प्रफुल शहारे व नांदगाव विभागातील कर्मचारी यांनी सुव्यवस्था केली भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सावणेर वासी व संत वामन महाराज संस्थान यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले.