सकाळी रस्त्यावर असतात मोठ्या प्रमाणात धुके.
नागरिक सातच्या आत घरात.
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे.
राज्यभरात थंडीची लाट आली असून,ग्रामीण भागात गारठा वाढला आहे. तीन ते चार दिवस ढगाळ वातावरणाबरोबरच थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.सध्या ग्रामीण भागात कडाक्याच्या थंडीने हुडहुडी भरण्यास सुरुवात झाली आहे.त्यापासून संरक्षणासाठी ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागल्या आहेत.आणि सर्वच नागरिक आता सातच्या आत आपापल्या घरात जात असल्याने रात्रीला जिकडे तिकडे रस्ते ओसाड दिसत आहेत. या कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी ऊबदार कपडे खरेदीस सुरुवात केली आहे.
सध्या दिवसभर ढगाळ वातावरण,मध्येच ऊन अन गार वारा वाहत असल्याने नागरिकांना हुडहुडी भरत आहे तर रात्री थंड गारवा अन् पहाटे कडाक्याची थंडी असे विचित्र हवामानात जाणवत आहे. विचित्र हवामान नागरिकांच्या आरोग्यावर परिणामकारक ठरत आहे.सर्दी, ताप,खोकला,पेशी कमी होण्याचे प्रकार हे सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात
रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. खासगी व सरकारी दवाखान्यात रुग्णांची गर्दी दिसत आहे. शेतात गहू,हरभरा,तूर पिकांची चांगली वाढ झाली आहे. थंडीचा कडाका वाढल्याने या शेतातच शेकोटी पेटवली जात आहे.वीजपंपांसाठी तीन टप्प्यात वीजपुरवठा केला जातो. दिवसा वीजपुरवठा पुरेशा दाबाने होत नसल्याने गहू, हरभरा व अन्य पिकांच्या आंतरमशागती पूर्ण झाल्या आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे. कडाक्याची थंडी वाढल्याने शेतकऱ्यांना शेतातच शेकोटी पेटवावी लागत आहे. हे
पिकांना लाभदायक ठरत आहे. रब्बीच्या पिकांना सध्या पोषक वातावरण असल्याने उत्पन्नात वाढ होण्याची आशा वाढली आहे.गुलाबी थंडीचा सध्या सर्व नागरिक मोठ्या प्रमाणात लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे.या थंडीमुळे सकाळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुके दिसत असल्याने जिकडे तिकडे रस्ते ओसाड झाले आहेत सकाळी १०.०० परेंत कुणीही आपल्या घराच्या बाहेर निघण्याची हिम्मत करताना कुणी दिसत नाही.