नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी.
अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघ पुरस्कृत शाखा नांदगाव खंडेश्वर यांच्यातर्फे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार दिनाचे अवचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार व ज्येष्ठ वृत्तपत्र वितरक यांच्या सत्कार घेऊन व ग्रामीण रुग्णालयात फळ व बिस्किट पाकिटांचे वाटप करून साजरी करण्यात आली जयंतीचे आयोजन शासकीय विश्रामगृह नांदगाव खंडेश्वर येथे करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर च्या प्रतिमेला अभिवादन व हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कायक्रमाचे अध्यक्ष गौरव इंगळे, जिल्हा मराठी पत्रकार संघ अमरावती हे होते.
प्रमुख पाहुणे नांदगावचे लोकप्रिय ठाणेदार विशाल पोळकर व हरिभक्त परायण मनोज निचत महाराज नांदगाव खंडेश्वर हे होते प्रथम प्रमुख पाहुणे व अध्यक्षांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली नंतर प्रमुख पाहुण्यांच्या व अध्यक्षांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर इंगळे पापड, सुनील तायडे नांदगाव खंडेश्वर ,अरुण शिंदे नांदगाव खंडेश्वर व वृत्तपत्र वितरक रामदास वरमकार शिवनी रसलापूर अवधूत गाडेकर धानोरा गुरव यांना शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन सत्कार व गौरव करण्यात आला.
कायक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र आखरे तालुका उपाध्यक्ष , प्रास्ताविक नंदकिशोर इंगळे तालुका अध्यक्ष ,आभार प्रदर्शन सुनील बनसोड तालुका सचिव यांनी केले कार्यक्रमाला तालुक्यातील पत्रकार ,प्रतिष्ठित नागरी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत . ग्रामीण रुग्णालयात फळ व बिस्किट वाटप करून कार्क्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्रीकृष्ण शिवबहादुरकर, गणेश शिंगजुडे आकाश वरघट, हंसराज उके ,मिलिंद कडू. भोजराज भगवे. ओम मोरे ,सचिन गिरी ,संघदीप घुगरे या युवा पत्रकारांनी परिश्रम घेतले