नांदगाव खंडेश्वर/प्रतिनिधी
दिनांक 08/01 रोजी पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर यांना गोपनीय बातमी मीळाली की, तळेगाव कडुन एका कथ्थ्या रंगाचे डाले असलेल्या ट्रकामध्ये अवैध्दरीत्या गोवंश जातीचे जनावर कोंबुन शिंगणापुर रोड ने जाणार आहे अशी खात्रिलायक माहीती मीळाल्यावरुन सदर ची माहीती ठाणेदार नांदगाव खंडेश्वर यांना देवुन मध्यरात्री 01/15 वा दरम्यान शिंगणापुर फाट्यावर नाकेबंदी केली असता एक ट्रक तळेगाव कडुन येत असतांना दीसुन आला ट्रक चालकाने ट्रक पोलीसांना पाहुन रस्त्यात थांबवुन ट्रक, सोडवुन पळुन गेला पोलीसांनी पंचासमक्ष ट्रक च्या मागच्या डाल्याची टॉर्च मध्ये पाहानी केली असता ट्रक च्या मागच्या डाल्यात अपु-या जागेत गोवंश जातीचे लहान मोठे 23 बैल आखुड दोरीने पाय व शिंगे, तोंड बांधलेल्या व त्यांना वेदना होईल अशा अवस्थेत वाहनामध्ये कोंबुन बांधलेले दीसुन आले.
सदर च्या ट्रक मधील एकुण 23 लहान मोठे गोवंश बैल व MH 40 Y 9061 क्रमांकाचा ट्रक असा एकुण 31,75,000/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन गोवंश बैलांना डॉ पंजाबराव देशमुख गोरक्षण संस्था कणी मीर्झापुर ता.नांदगाव खंडेश्वर येथे दाखल करण्यात आले आहे. आरोपीचे कृत्य कलम महाराष्ट्र पशु रक्षण अधीनीयम 1976 चे कलम 5,5 (अ) (1) सह कलम प्राण्यांचा छळ अधीनीयम 1960 कलम 11(1), (क), (घ), (ङ), (च), (ज), सहकलम मोटार वाहन अधीनीयम कलम 83,177 सहकलम महाराष्ट्र पोलीस अधीनीयम कलम 119 प्रमाणे होत असुन त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर येथे नमुद कलमान्वये गुन्हा दाखल करुन तपासावर आहे.
फरार आरोपीचा शोध घेणे सुरु आहे. सदर ची कार्यवाई मा. पोलीस अधीक्षक सा. श्री विशाल आनंद सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री विक्रम साळी सर, उप वि पो अधी सा सुर्यकांत जगदाळे सर, ठाणेदार नांदगाव खंडेश्वर स.पो.नि श्री विशाल पोळकर सर यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि दर्शन दिकोंडवार ए.एस.आय /1414 विष्णुपंत तीरमारे, पो हे का / 861′ अमरदिप वासनकर, पो.कॉ/ 2403 अजहर खान, पो.कॉ /1377 राहुल गजभीये, पोका/ 2327 संजय ढोके (चालक) यांनी पार पाडली.