चांदुर रेल्वे/प्रतिनिधी
तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे दिनांक ८/१/२०२४ सोमवारला दुपारी १२.०० वाजता संस्थानचे सभागृहात संस्थानची सामान्य सभा संस्थानचे अध्यक्ष वामणराव केळबाजी रामटेके यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या संस्थानचे सामान्य सभेत विश्वस्तांचे राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या संस्थानचे विश्वस्त पदी अशोक हरिदास सोनवाल यांची नवनियुक्त विश्वस्त पदी बहुमताने निवड करण्यात आली.
संस्थानचे या सामान्य सभेला संस्थानचे अध्यक्ष वामण केळबाजी रामटेके, उपाध्यक्ष कृपासागर रामरावजी राऊत, सचिव गोविंद रामसिंगजी राठोड सर्व विश्वस्त विनायक तुकारामजी पाटील, दिंगाबर नामदेवराव राठोड, पुंजाराम वैतागराव नेमाडे, अनिल दिवाणजी बेलसरे, फुलसिंग रूपसिंगजी राठोड, चरणदास नामदेवराव कांडलकर, वैभव दिलीपराव मानकर, स्वप्निल बबनराव चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.