नांदगाव खंडेश्वर/प्रतिनिधी.
शिक्षण विभाग पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर अंतर्गत नांदगाव परिक्षेत्र समाविष्ट केंद्र मांजरी म्हसला, नांदगाव खंडे. व सुलतानपूर बिटस्तरीय क्रीडा महोत्सव दि. २९/१२/२०२३ व ३०/१२/२०२३ रोजी जि.प.पु.माध्य.शाळा, रोहना येथे संपन्न झाला.या बिटस्तरीय किडामहोत्सवात तिनही केंद्रातील 300 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. बक्षिस वितरण व समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
या क्रिडा महोत्सवात नांदगाव केंद्रातील जि.प.पूर्व माध्यमिक शाळ येणस सर्वच खेळामध्ये सहभागी होती . येणस शाळेतील विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट खेळ झाले यात येणस शाळेला विजयी व उपविजयी बक्षिस मिळाले व येणस या शाळेची विद्यार्थीनी कु . वंशिका रघुते हिने इतर खेळासह उंच उडीत उपविजयी व लांब उंडी उडीत विजयी झाल्याने ती मान्यवरांच्या कौतुकास पात्र ठरली . व पुढे तिची तालुका स्तर खेळासाठी निवड झाली . तसेच प्रतिक गायधने या विद्यार्थ्याला सुद्धा तालुका स्तर खेळासाठी निवड झाली.
यात येणस शाळेतील क्रिडा शिक्षक श्री . मनोहर चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनात विध्यार्थ्यांनी उत्कष्ट कामगिरी केली व या क्रिडा महोत्सवात श्री मनोहर चव्हाण सर यांनी उत्कृष्ट पंच म्हणून कार्य केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले .येणस शाळेच्या विद्यार्थ्यांचे व मुख्याध्यापक श्री प्रशांत खरबडे ‘ श्री मनोहर चव्हाण . श्री परमानंद वैष्णव सर व प्रतिभा राउत मॅडम .सर्व शिक्षकाचे सर्वत्र कौतुक होत आहे . समारोप कार्यक्रमाला म्हणून अध्यक्ष मा.सौ.कल्पनाताई वानखेडे केंद्रप्रमुख मांजरी म्हसला हे उपस्थित होत्या. बक्षिस वितरक मा.श्री.डाॅ.स्वप्निल मालखेडे तालुका आरोग्य अधिकारी नांदगांव खंडेश्वर यांचे हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री.दिपकजी कोष्टी (केंद्रप्रमुख, सुलतानपूर), मा. जफर अली (केंद्रप्रमुख नांदगाव खंडे.) मा.श्री.सुरज मंडे सर (क्रीडा संयोजक) तसेच नांदगाव परिक्षेत्रातील सर्व मुख्या. सर्व शिक्षक/शिक्षिकावृंद व विद्यार्थींच्या उपस्थितीत समारोपीय कार्यक्रम पार पडला.