माहुली चोर ते फुबगाव रस्त्याचे डांबरीकरण झाले पण साईड पट्ट्या भरल्याच नाही.
सा.बा.विभागाचे हेतू परस्पर दुर्लक्ष.
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी.
अमरावती-यवतमाळ रोडच्या साईड पट्ट्या न भरल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून या रस्त्याचे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुली चोर पासून तर फुबगाव फाटा परेंत रत्यावरील खड्डे भरणे आणि डाबरीकरणं करण्यात आले असून हे काम डिसेंबर मध्येच पूर्ण झाले असून ठेकेदाराने या रोडच्या आजू – बाजूच्या साईड पट्ट्या भरल्या नसल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या टू व्हीलर वाहनांना समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रकाशाने रोडच्या खाली आपले टू व्हीलर वाहन उतरवावे लागते परंतु य रोडच्या आजू बाजूला ठेकेदाराने साईड पट्ट्या भरल्या नसल्याने त्या वाहनाचा एकदम तोल जाऊन अनेक नागरिकांच्या गाड्यांचे नुकसान तर होतच आहे परंतु त्यांना मोठ्या प्रमाणात इजा सुद्धा पोहचत आहे.
याकडे बडनेरा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप-अभियंता यांचे कोणत्याही प्रकारचे लक्ष नसून ते अनेकदा या रोड करून गेलेत परंतु त्यांनी य रोडची कधीही पाहणी केली नाही कारण सबधित ठेकेदाराने अगोदरच त्यांचे खिसे गरम केल्याचा आरोप अपघात ग्रस्त वाहन चालकांनी लावला असून उप – अभियंता हे फक्त उंटावरून शेळ्या हाकन्याचे काम करीत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया या रोडने जाणाऱ्या टू व्हीलर चालकांनी व्यक्त केल्या असून हे काम करणाऱ्या संबधित ठेकेदाराने या कामाचे देयक हे साईड पट्ट्या न भरताच काढले असल्याची माहिती सुद्धा काही नागरिकांनी सदर प्रतिनिधी जवळ बोलताना व्यक्त केल्या आहेत. या कामाकडे सा.बा.विभागाच्या अधिकाऱ्यांचे कोणतेही लक्ष नसल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना साईड पट्ट्या न भरल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागत असून या रस्त्यावर एखादा मोठा अपघात झाल्यावर सा.बा.विभागाची झोप उघडेल का.?
असा प्रश्न उपस्थित होतो आहे. एखादा मोठा अपघात होण्यापूर्वी या विभागाने कुभकरणी झोपेतून जागे व्हावे अन्यथा या विभागाच्या अडेलतट्टू अधिकारी यांचे विरुद्ध आंदोलन छेडन्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे तसेच लवकरात लवकर या रोडच्या आजू बाजूच्या साईड पट्ट्या त्वरित भरण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे.सबधित ठेकेदार हा धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघाचे आमदाराचा निकटवर्तिय असून या ओळखीचा तो पुरेपूर फायदा घेत असून त्याच्या या वजनामुळेच सा.बा.विभागाचे अधिकारी त्याला भित असल्याचे दबक्या आवाजात बोलल्या जात आहे.