चांदूर रेल्वे/प्रतिनिधी.
चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे दिनांक ११/१/२०२४ गुरुवारला सकाळी ५.०० वाजता पौष मास मांडीची सुरुवात महाराजांच्या अरजेने विश्वस्त मंडळाचे उपस्थितीत लहान मंदिरात ढाल बसवून करण्यात येणार आहे आणि दुपारी ४.०० वाजता संस्थानच्या वतीने "अमावास्या" निमित्त "चंदन - ऊटीचा" कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
पौष मास मांडीमध्ये बाहेरगावातील अवधूत भजन मंडळांचा दैनंदिन सहभाग राहणार आहे. त्याकरिता संस्थानच्या वतीने नियोजन तयार करण्यात आले आहेत.या सहभागी अवधूत भजन मंडळांकरिता संस्थानच्या वतीने चहा, नाश्ता आणि भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच श्रीफळ देऊन मंडळांचा सत्कार आणि नवीन सहभागी मंडळांना महाराजांची गाथा भेट म्हणून देण्यात येणार आहे.
चंदन उटीला बाहेर गावावरून येणारे भाविकांकरिता महाप्रसाद अन्नदान दाते संजय उ. ठाकरे रा. सावरखेडा ता. भातकुली जि.अमरावती यांचे तर्फे व संस्थानचे अन्नदान समितीच्या नियंत्रणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच संस्थानचे प्रसादालयामध्ये प्रसाद देणगी पावती घेऊन भाविकांना प्रसादाचा लाभ घेता येईल
भाविकांकरिता अगदी थोड्या दिवसात नवीन प्रसादालयात भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
त्याकरिता नवीन प्रसादालयाचे संस्थानच्या वतीने काम सुरू आहे. संस्थानचे गौरक्षणमध्ये भाविकांनी दान दिलेल्या गायी आहेत, त्यांची देखभाल संस्थान करीत आहेत . त्या गायीकरिता चाऱ्याची नितांत आवश्यकता आहे. जे इच्छुक दाते असतील, त्यांनी गौरक्षण मधील गायीकरिता चारा पाठवण्याची व्यवस्था करावी, असे संस्थानच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
तरी सर्व भाविक- भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी विनंती विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.